कोलकत्ता आणि बदलापूर च्या घटनांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला फाशी द्या वंचित ची मुख्यमंत्र्यांना मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

कोलकाता येथील महीला डॉक्टर च्या लैंगीक अत्याचार व निर्धन हत्याचा तिव्र निषेध तसेच बदलापुर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगीक अत्याचाराच्या घटणेचा तिव्र निषेध तसेच योग्य तपास करून आरोपों विरूद्ध फास्ट ट्रॅक न्यायालया मार्फत प्रकरण चालवीण्याबाबत देशात कोलकाता येथील आर जे मेडीकल कॉलेज येथे महीला डॉक्टर सोबत घडलेली लैंगीक अत्याचाराची व त्यानंतर निर्दयी व अमाणुष हत्याची घटणेमुळे देशातील तमाम देश बांधवांना दुःखात असतांनाच बदलापुर येथील अल्पवयीन विद्यार्थी मुलीवर झालेल्या लैंगीक अत्याचाराच्या घटणेमुळे समाज मन सुन्न झाले सदरची घटणा ही अतिशय दुःखद व वेदनादायी आहे.वरील गुन्हयातील आरोपींना कठोरात कठोर शासन होणे आवश्यक असुन समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्याकरीता वरील प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवुन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती पाउले शासनाने उचलावी,तसेच महीला व मुलींच्या सुरक्षे बाबतीत पण योग्य ती पाउले शासनाने उचलावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल ही मागणी वंचित बहुजन आघाडी राळेगाव च्या वतीने या निवेदनाद्वारे मुखमंत्र्यांना करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राळेगाव तालुका अध्यक्ष ऍड.अफसर काझी, कार्याध्यक्ष लोकेश दिवे,विधानसभा प्रमुख डॉ.ओमप्रकाश फुलमाळी,शहर अध्यक्ष दिपक आटे,तालुका उपाध्यक्ष मिलिंद धनविज,तालुका उपाध्यक्ष सूरज ठुले,तालुका उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड,अजय दारोंडे, तालुका महासचिव प्रकाश कळमनकर,ऍड, दीक्षांत खैरे, या सह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते