
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ येथील विश्रामगृह येथे दि 26 तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या उपस्थितीत
यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, विदर्भ अध्यक्ष विजय सुर्यवंशी, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण टेकाडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, जिल्हा सचिव धनंजय वानखडे, जिल्हा संघटक पुरूषोत्तम कडवे, राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखडे,वणी तालुका अध्यक्ष महेश टिपले, उमेश अवघड नेर तालुकाध्यक्ष इत्यादींची निवड करण्यात आली आहे, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय कारवटकर, तर राळेगाव तालुका अध्यक्ष पदी खुशाल वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे ,या निवडीमुळे राळेगाव तालुक्यात आनंद निर्माण झाले आहे
