
सहसंपादक ; रामभाऊ भोयर
भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा शाखा यवतमाळ व आयटक यवतमाळ जिल्हा यांचे संयुक्त मोर्चा दि.३०-०८-२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत प्रधान मंत्री व मुख्य मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले मोर्चात मागण्या कामगार कर्मचारी विरोधी ४ श्रम सहीता रद्द करा , अंशकालीन स्त्री-परिचरांना रू.६०००/- मानधन वाढीचा जिआर व पोषण आहार कर्मचारी यांचा रू.१०००/- वाढीचा जिआर काढा , असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन २६ हजार लागु करा, जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्यामुळे ती तात्काळ करा, ५०% आरक्षणाची अट हटविण्यात यावी , स्मार्ट मिटर , प्रिपेड मिटर रद्द करण्यात यावे, ईमारत बांधकाम कामगारांना ग्रामीन व शहरी भागात आवास योजनेंतर्गत अडीच लाख रुपये देण्यात यावे तसेच घरकामगारांसाठी प्रलंबित कल्याण मंडळ रीतसर सुरू करा , शेतकरी व शेतमजूरांचे संपूर्ण कर्ज माफ करा, नविन शैक्षणिक धोरण रद्द करा, शेतकरी आंदोलनात दिलेल्या आश्वासना प्रमाने किमान आधारभूत किंमतीचा कायदा करा या व इतरही मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी विजय ठाकरे, दिवाकर नागपूरे, ईश्वर दरवरे, संजय भालेराव, ज्योती रत्नपारखी, गुलाब उमरतकर, शंकर कदम , विलास ससाने, कैलास कांबळे, वैशाली चिव्हाने सुरेश गायकवाड, कल्पना सोयाम मालुताई सनगावकर, प्रविण सोनटक्के, नामदेव ढोरे , सुरेश गायकवाड , यासह शेकडो महिला पुरुष कामगार उपस्थित होते
