
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दहीहंडीचा उत्सव म्हटलं की मुंबई आणि ठाण्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हे आपण ऐकलंच आहे पण मात्र विदर्भात तरी प्रत्यक्षात खूप कमी बघितलं जातं म्हणायला हरकत नाही मात्र या दहीहंडीचा उत्सव रायगावकरांनी अनुभवला. दिनांक 29 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव रायगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर राळेगाव शहरातील राजीव गांधी क्रीडा संकुल येथे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके मित्र परिवारातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती उंच अशी दहीहंडीचा थरार यावर्षी रायगावकरांनी अनुभवला.राळेगाव निवासी विश्वहिंदू परिषद,बजरंग दल , महाकाल ग्रुप,श्री राम सेना ग्रुप,श्री राम जन्मोत्सव समिती,श्री हनुमान जन्मोत्सव समिती,राळेगाव स्वच्छता अभियान समिती,क्रांतिवीर शहीद भगत सिंग संघटना,बिरसा मुंडा समिती या सर्व संघटनेच्या सदस्यांनी दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग दिला,दहीहंडी उत्सव गोविंदा आला रे आला म्हणत डिजेच्या तालात जल्लोषात साजरा करण्यात आला.
या दहीहंडीचे पूजन आमदार अशोक उईके यांच्या उपस्थितीत पार पडले. पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठा दहीहंडी उत्सव राळेगावकरांना अनुभवायला मिळणार असे यावेळी प्राचार्य अशोक उईके म्हणाले.आणि संचाच्या अध्यक्षाला अभिनन्दन करून ट्रॉफी व मानधन देऊन बक्षीस वितरण केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सागर वर्मा यांनी उत्कृष्टपणे सांभाळले हा उत्सव बघुन अनेकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
