वाघ आला वाघ,वाघ गेला वाघ ,प्रशासन सुस्त, लोकप्रतिनिधी मस्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाघोबानी आपला वट निर्माण केला असून या वाघाने हौदोस घातला आहे. हा वाघ वर्धा जिल्ह्यातून आला असल्याचे म्हटले जात असून यवतमाळ जिल्हात प्रथम प्रवेश केल्यानंतर अंतरगाव या गावातील एका शेतकऱ्यांच्या गायीची शिकार करता करता थोडक्यात बचावली असली तरी त्या गाईला या वाघाने जखमी करून सोडले.त्यानंतर या वाघाने आपला मोर्चा झाडगाव परिसराकडे वळविला असता झरगड येथील वाघाडे नामक शेतकऱ्यांच्या बैलाला शिकार बनवून पुढे मार्गक्रमण करत करत वाघोबांनी वरूड जहांगीर व बोराटी जंगलाला लागून असलेल्या बुकई शिवारात आपलं बस्तान बसवले.अशातच वाघ आल्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना माहिती झाली होती.जंगल भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ये जा करायला परवडत नसल्याने ते शेतकरी शेतात गोठा तयार करून शेतकरी आपली जनावरे गोठ्यात बांधून ठेवत असून सोबत शेतकरी सुद्धा रहात असताना एका दिवशी विजय राठोड नामक शेतकऱ्यांच्या बैलाची शिकार करून आपली भुक भागवली.एवढ्यावरही समाधान न झाल्याने वाघोबानी आपला मुक्काम बरेच दिवस त्याच परिसरात थाटला.अशातच या घटनेने घाबरलेल्या शेतकऱ्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली तर काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले.या दरम्यान वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाघाच्या परिसरात येऊन पाहणी केली.आणि वाघाला पकडण्याचे किंवा मारण्याचे आम्हाला आदेश नसून तुम्ही स्वताच्या जिवाची जबाबदारी स्वतः घ्यावी असा सल्ला दिला याच दरम्यान वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली कि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पांढरकवडा येथे वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत राळेगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके यांनी मिटींग घेतल्याचे कळले त्यानंतर आपल्या आमदार साहेबांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मिटींग घेतली आता आपली चिंता मिटली अशा अवस्थेत असल्याला बरेच दिवस लोटले असून वाघ पकडण्याचे कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.अशा परिस्थितीत परत वाघाने आपला परतीचा प्रवास सुरू करून वरूड जहांगीर आणि झरगड परिसरात वळवला असून झरगड पाझर तलावातील भिंतीवर वाघ झरगडच्या एका स्त्रीला दिसला असून तीने वाघाला पाहिले असल्याने घाबरली असून झरगडवासियांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांला थांबवले होते.अशा अवस्थेत एवढ्या दिवसांपासून शेतकऱ्यांना हाल अपेष्टा भोगाव्या लागत असून वाघ पकडण्याचे आदेश नसेल तर जिवित हानी झाल्यास मोबदला देण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेती संरक्षणासाठी तारेचे कुंपण द्यायला हवे यासाठी विद्यमान आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके यांनी प्रयत्न केले पाहिजेत. अशाही परिस्थितीत आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी अजूनही भेटी दिल्या नसल्याने आणि वाघ कधी पकडणार या साठी आमदार साहेब वनविभागाच्या कर्मचाऱ्यांला कधी आणतात यासाठी या गावकऱ्यांचे लक्ष रस्त्याकडे लागले आहे अशातच एवढ्यात वाघ भुमिगत झाला असून सध्या कुठल्याही शेतकऱ्यांना दिसला नसल्याने लोकप्रतिनिधीची डोकेदुखी कमी झाली असून आता परत वाघाने दर्शन दिले तर परत तेच काम शेतकऱ्यांना करावं लागणार आहे.या साध्या समस्या जर लोकप्रतिनिधी सोडवू शकत नसेल तर मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला बरा अशी चर्चा या परिसरातील नागरिक करीत आहे.