विधानसभा निवडणुका जवळ आल्या, उमेदवार पाहतात आमदार बनण्याची स्वप्ने, शेतकऱ्यांची स्वप्ने पाहणारा नेता गेला कुठे ?

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा निवडणुका जवळ आल्या.सर्वत्र निवडणूकीचे वारे जवळपास वाहायला लागले.अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज घेऊन आपापल्या पक्षाकडून प्रयत्न करायला लागले.या निवडणुकीत राळेगाव मतदार संघात महाविकास आघाडी आणि युतीत खरी लढत असून नेहमीप्रमाणे जवळपास कांग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारात लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दोन्ही पक्षाकडून अनेक उमेदवार आमदार बनण्यास इच्छुक आहेत.कांग्रेस पक्षाकडून बरेच उमेदवार आमदारकीची तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून भारतीय जनता पक्षाकडून जवळपास एकच उमेदवार म्हणजे विद्यमान आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके हे दावेदार असतांना परत दुसरे एक सुधाकर चांदेकर नावाचे कळंब तालुक्यातील उमेदवार आपल्याला भाजपाची उमेदवारी निश्चित मिळणार असल्याचा दावा करत असून त्यांनी अनेक ठिकाणी बॅनर लावले असून त्यांचा9/9/2024 राळेगाव तालुक्यात दौरा झाला असून त्यांनी राळेगाव तालुक्यात काही ठराविक नेत्यांच्या भेटी घेतल्या असून आपणास उमेदवारी निश्चित मिळणार असल्याचे अनेक ठिकाणी भाकित केले असल्याने राळेगाव तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.अशाच प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनेक उमेदवार उमेदवारीचा दावा करत असून कांग्रेस पक्षात सुद्धा असाच प्रकार काहिसा असून या पद्धतीने ही निवडणूक आता पासूनच रंग घ्यायला लागली असतानाच ईकडे निसर्गाने मात्र आपला रंग दाखवणे अजूनही सुरूच ठेवले असून शेतीला लागलेला खर्च अति पावसामुळे आवाक्याबाहेर गेला असून पाऊस सध्या पण सुरूच आहे.अशातच शेतीला खर्च लावून लावून शेतकरी नाकीनऊ आला असून आता पिकाची टक्केवारी निश्चितच घसरणार असल्याने शेतीला लागलेला खर्चच निघणार नसल्याने बाकी देवाणघेवाण होणार कशी.अशातच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसेच मोठ्या संख्येने नगदी स्वरूपात सर्व शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असं वाटत असतानाच यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधीची आवश्यकता असतांना प्रत्येक प्रतिनिधी आपापली उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करणार कोण हा प्रश्न मतदारांच्या चर्चेत दिसून येत आहे.