सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याच्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका प्रमुख मनवर शेख व शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा नव स्वराज्य न्युज चे मुख्य संपादक , महाराष्ट्र रत्न पुरस्कार तथा विविध पुरस्काराने सन्मानित , कुणालाही दिवस – रात्र मनात कुठलाही भेदभाव , किंतु – परंतु न ठेवता मदतीस धावून जाणारे सचिन वैद्य यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करुन चिमुकल्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. यावेळी छाया गाडे , कल्पना डडमल , हार्दिक सोनुले , मिहान काडे , भाविक कुमरे , श्लोक कुमरे , खुरीमत लेनगूरे , निकुंज मोहर्ले , अर्णव चौधरी , काव्या बागडे , अनुश्री घोईकर , पलक डाहकर , आरुषी मसराम , निवृत्ती शेंडे , लावण्या शेंडे , यशस्वी धोबे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सहकार्य केले.