
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा मतदार संघातील राळेगाव, कळंब, बाभुळगाव तालुक्यातील बि. एल. ए. ना आज दिनांक 29/9/2024 रोजी मुंबई येथील प्रशिक्षक तुषार रईझा यांनी निवडणूक कालावधीत सुरवातीपासून तर शेवटपर्यंत घ्यायची काळजी या बद्दल सविस्तर माहिती सांगितली. हा कार्यक्रम बारा वाजता सुरू करण्यात आला.या कार्यक्रमात सुरवातीला तुषार रईझा यांचे स्वागत कळंब तालुक्यातील शशिभाऊ देशमुख यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या नंतर मंचावर उपस्थित राळेगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे माजी आमदार प्राध्यापक वसंत पुरके सर, राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, वसंत जिनिंग राळेगावचे उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, राळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रविंद्र शेराम, कळंब तालुक्याचे महादेव काळे, अशोक उम्रतकार, सुंदरदास कांबळे,कोडापे साहेब, इत्यादी मान्यवर महोदयांचे शब्द सुमनानी स्वागत केले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र तेलंगे यांनी केले.तर सविस्तर कार्यक्रमाची रूपरेषा माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर यांनी मांडली.या कार्यक्रमाला बि. एल. ए. नी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती सोबतच तीनही तालुक्याचे महत्त्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रदीप ठुणे यांनी केले तर आभार शशिकांत देशमुख कळंब यांनी मानले.
