शिक्षकांचायेण्याजाण्यात जातो वेळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक तसेच शिक्षीका आपल्या अलिशान चारचाकी गाड्याने अपडआऊन करतांना दिसत आहे . यात काही शिक्षक तर जिल्ह्याच्या ठिकाणाहून तर काही जिल्ह्याच्या बाहेरुन अपडाऊन करत आहे . विशेष म्हणजे काही शिक्षक व शिक्षीका या शाळेवर लेट येने व अगोदर जाने असा सुखरूप प्रवास करताना दिसत आहे .शाळा समित्या फक्त नामधारी ठरत आहे . त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण आता धोक्यात येत आहे .जिल्हा परिषद शाळेत फक्त शेतकरी, शेतमजूर यांचेच मुल शिक्षण घेताना दिसत आहे धनधांडक्याचे मुले हे खाजगी इंग्लिश मिडीयम स्कुल काॅन्ह्वेट मधे शिक्षण घेत आहे त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण वेळेवर नाही मिळाले तरी बोलनारे कोनीच नाही कारन शेतकरी तसेच शेतमजूर हे सकाळीच आपल्या शेतात काम करण्यासाठी जात असतात . शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत आहे म्हणून ना इलाजाने काही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत काढून प्रायव् शाळेत शिक्षनासाठी आपल्या मुलांना पाठवण्यात आले .शासनाने सरकारी शाळांचे खाजगीकरण झाले तर खुपच चांगले होईल असे शेतकरी शेतमजूर चर्चा करताना दिसत आहे . म्हणून जिल्हा परिषद शाळेचा वाली कोनीच नाही केव्हाही या आणी केव्हाही जा असा अलिशान प्रवास संध्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा चालू आहे .