
राळेगाव विधानसभा मतदारसंघात २ लाख ८७ हजार २५५ मतदार हक्क बजावतील. एकूण ३५० मतदान केंद्रावर होणार मतदान ; निवडणूक निर्णय अधिकारी यांची पत्रकार परिषदहोणाऱ्या विधानसभा निवडणुकी करिता प्रशासन सज्ज झाले असून राळेगाव ७७ विधानसभा मतदार संघात मतदान शांततेत होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावे तसेच निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होवू नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विशाल खत्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे .
७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व अधिकारी निवडणूक घेण्याकरता सज्ज झाले असून राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २ लाख ८७ हजार २५५ मतदार हक्क बजावतील असे पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले आहे. तसेच विविध समित्या गठीत करून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे एकूण मतदारात २ लाख ८७ हजार २५५ मतदार असून यात स्त्री मतदाराची संख्या १ लाख ४१ हजार ७१२ एवढी असून पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४५ हजार ५४३ एवढी आहे .. तालुका निहाय मतदारांची संख्या राळेगाव तालुका ९०६९२.. बाभुळगाव तालुका ७३२०६ कळंब तालुका ८४६६५ रुंझा सर्कल २९५०९. अशी आहे.तर एकूण ३५० मतदान केंद्रावर निवडणूक घेण्याची तयारी करण्यात आली आहे
राळेगाव ७७ मतदार संघात राळेगाव बाभुळगाव कळंब पांढरकवडा तालुक्यातील रुंझा सर्कल यांचा समावेश आहे या सर्व तालुक्यातील एकूण गावांची संख्या ४६३ एवढी असून त्याकरिता ३५० मतदार केंद्र तयार करण्यात आली आहे. या मतदारसंघात सर्व केंद्र सर्वसाधारण असून उपद्रवी केंद्र एकही नसल्याचे माहिती यावेळी देण्यात आली आहे.
आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पार पाडण्याकरिता विविध समित्या गठीत करण्यात आले आहे यात सांख्यिकी समिती संपूर्ण निवडणुकीचे चित्रीकरण करण्यासाठी समिती सहा फिरते पथक दोन लेखा परीक्षण समिती तर ३२ सदस्य संख्या असलेली परिक्षेत्र अधिकाऱ्यांची समिती व या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याकरिता एक आदर्श आचारसंहिता समिती गठीत करण्यात आली आहे या सर्व समितीच्या माध्यमातून निवडणूक पार पाडली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी विशाल खत्री यांनी दिली
