राळेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके यांना मिळणारा प्रतिसाद ठरतोय विरोधकांची डोकेदुखी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

 

विधानसभा निवडणुका दिवसेंदिवस प्रचारात जोर धरू लागल्या असून सर्वच उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचाराला लागले असून राळेगाव विधानसभा दरवेळी एकास एक अशी निवडणूक होत असल्याने खूप असा त्रास होत नव्हता पण या निवडणुकीत मात्र चौरंगी निवडणूक होणार यात काही शंका नाही.महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके सर आणि महायुतीचे उमेदवार डॉ अशोक ऊईके सर यामध्ये तुल्यबळ लढत होण्याचे चिन्ह दिसत असून यांच्या लढतीत मनसे उमेदवार अशोक मेश्राम आणि वंचित आघाडीचे उमेदवार किरण कुमरे हे कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरतात हे तर वेळच ठरविणार असेल तरी पण आज सत्ताधाऱ्यांना त्यांनी शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्या सोबतच दैनंदिन जीवनातील वस्तूवर जिएसटी अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात घातक ठरणार असून सोबतच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्याने त्यांची मतं सुद्धा महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात जाणार असून ती मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके सर यांचे पारडे जड होणार असून सत्ताधाऱ्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील मतदार स्वयंस्फूर्तीने महाविकास आघाडीच्या प्रचार यात्रेत सहभागी होत असल्याने या निवडणुकीला वेगळेच वळण प्राप्त झाले असून दिनांक 9/11/2024 रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचारयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आनंद देणारा जरी ठरला असेल तरी डॉ अशोक ऊईके यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला असल्याचे दिसून येत असून आजच्या प्रचारयात्रेचा विषय तालुक्यात चर्चेला उधाण आले असून अनेक मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता मतदार राजा यावेळी प्राध्यापक वसंत पुरके सरांची झोळी भरणार असल्याचे दिसून येते.