मनसेचे अधिकृत उमेदवार अशोक मारुती मेश्राम यांची राळेगाव रॅली चा जोरदार बोलबाला

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक आठ नोव्हेंबर शुक्रवारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार माननीय अशोक मारुती मेश्राम यांची भव्य प्रचार रॅली निघाली राळेगाव नगरीमध्ये जनतेने मोठ्या उत्स्फूर्तने रॅलीमध्ये सहभाग नोंदविला माजी पुरके नको आजी उईके नको आता “बदल हवा चेहरा नवा” अशोक मेश्राम हाच उमेदवार खरा यांनाच शिक्का मारा “असा जल्लोष राळेगाव नगरीमध्ये दुमदुमला .
“राळेगाव मध्ये नवा चेहरा अशोक मेश्राम हाच खरा बाकीच्यांना हद्दपार करा” असा सूर राळेगाव नगरी मधून ऐकायला मिळाला अशोक मारुती मेश्राम यांनी प्रचारामध्ये सक्षम भक्कम पर्याय उभा केल्यामुळे आजी-माजी उमेदवारांचे धाबे दणाणले आहे अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून मतदारसंघांमध्ये उमटत आहे.