
वरोरा प्रतिनिधी धर्मेंद्र शेरकुरे
75 व्या संविधान दिनानिमित्त मजरा रै येथे आज संविधान जागृती व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आज 26 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मजरा रै चे सरपंच राकेश बोढे तसेच उद्घाटक म्हणून वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती वरोराचे संवर्ग विकास अधिकारी बिडीओ गजानन मुंडकर ,कविश मेश्राम सदस्य बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य,सौ निर्मला देशकर शिक्षिका,लोमेश सातपुते अध्यक्ष बौद्ध पंच कमिटी मजरा रै , ग्रामसेवक सुरेश वाढई ,श्री नरड ग्रामसेवक ग्रामपंचायत मजरा ,आयु साधना दिवे पोलीस पाटील मजरा रै ,सोमाजी नामे अध्यक्ष तंटामुक्त समिती मजरा रै, अक्षय ठमके सामाजिक कार्यकर्ते वरोरा, धर्मेंद्र शेरकुरे सामाजिक कार्यकर्ते चिनोरा हे उपस्थित राहणार आहे,सकाळी ८ ते ९ बुद्ध वंदना बौद्ध विहार येथे, सकाळी ९ ते १० प्रभातफेरी , सायंकाळी ४ वाजता ते ६ वाजेपर्यंत संविधान जागृती व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे तसेच सायं ६ ते राञो १० वाजेपर्यंत मुंबई येथील संघर्ष शिंदे व प्रतिमा लोखंडे नागपूर यांचा बुद्ध व भीम गीतांचा कव्वालीचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जास्तीत जास्त लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध पंच कमेटीचे अध्यक्ष लोमेश सातपुते यांनी केले आहे.
