निवडणूक काळात दिलेला शब्द पुरके सरांनी पाळला, आष्टोणा येथील विद्या सुर या बेघर महिलेला दिली पंचवीस हजार रूपयांची मदत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नुकताच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील श्रीमती विद्या सुर यांच्या घराची झालेली दुर्दशा तेथील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक वसंतराव पुरके सरांच्या निदर्शनास आणून दिली.त्यावेळी प्राध्यापक वसंतराव पुरके सरांनी मदतीची घोषणा केली होती. बरेचसे लोक प्रतिनिधी असतात की वेळ काढून नेण्यासाठी खोटे आश्वासन देऊन निघुन जातात आणि निवडून आले तरी परत येण्याचा पता लागत नाही पण प्राध्यापक वसंतराव पुरके सरांच्या बाबतीत काही वेगळेच घडले. त्यांनतर निवडणूक झाली प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला.परंतु जुन्या लोकांची एक म्हण आहे . , बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.अशाच प्रकारे निवडणूक काळात दिलेल्या शब्दाला जागून आपल्या पराभवाला विसरून प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांनी दिनांक 29/11/2024 रोजी सायंकाळी आपल्या लवाजम्यासह आष्टोणा गाव गाठून ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इंजिनीअर अरविंदभाऊ वाढोणकर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे , धानोरा विभागातील प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ भोयर यांच्या उपस्थितीत श्रीमती विद्या सुर या बेघर महिलेला पंचवीस हजार रूपयांची रोख रक्कम दिली.त्यावेळी गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा दिसून आली की सर पराभूत झाल्यानंतरही त्यांनी दिलेला शब्द पाळला.त्यावेळी प्राध्यापक वसंतराव पुरके सर आपल्या भाषणात म्हणाले की निवडणूक येणार आहे जाणार आहे.यश अपयश चालणारच आहे.मी जरी निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी सत्तेच्या विरोधात संघर्ष करून हा अल्पशा मतांनी झालेला पराभव कसा झाला आणि का झाला या विषयावर जास्त चर्चा न करता मी आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जेष्ठ नेता म्हणून मी पक्षाचे काम करत राहणार असून मला पराभुत करण्यासाठी विरोधकांना लागलेली सर्व प्रकारची ताकद आणि माझा अल्पशा मतांनी झालेला पराभव हा निश्चितच माझ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, मतदारांनी घेतलीली मेहनत ही माझ्यासाठी आणि पक्षासाठी जमेची बाजू असून आता सुद्धा जनतेनी केलेले मतदानरूपी प्रेम दहा वर्षांनंतर सुद्धा अजूनही कायम असून मी एवढं मतदान पाहून भारावून गेलो अशा प्रकारे त्यांनी भाषणातून सांगितले.या वेळी पंढरीनाथ काकडे, तुकाराम काकडे सह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.