
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील राज उल्हास कोरले यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा यहोवा यीरे फाऊंडेशन व कलाजिवन बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील आर. के. सेलिब्रेशन हॉलमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. महेंद्र चव्हाण (सिनियर पोलीस इस्पेक्टर) यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीजचे डायरेक्टर फहीम सरकार, लावणी सम्राज्ञी शिल्पा शाहीर, साऊथ आफ्रिकेतील कु. एंजला नैनाराव, गायिका जयश्री सोळंके (अमरावती), आणि युवराज ठाकरे यांचा समावेश होता.
सन्मान सोहळ्याच्या नियोजनात यहोवा यिरें फाऊंडेशनच्या अध्यक्षा एलिजा बोरकुटे आणि त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मोनालिसा हिने केले, तर सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरुष आवाजात सादर केलेल्या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गडचिरोलीतील या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यवीरांना गौरवण्यात आले. सभागृह रसिकांनी फुलून गेले होते, आणि सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
