आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने थकीत मानधन व वेतनवाढीचा जिआर काढण्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कर्मचारी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत सरकारी व खासगी शाळेत आहार शिजवून मुलांना खाऊ घालणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांचे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मानधन व इंधन बिल प्रशासनाने अदा केलेले नाही थकीत आहे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अद्यापही ग्रँड आलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन व इंधन बिल जमा झाले नाही चार महीण्याचे मानधन शालेय पोषण आहार कर्मचारी यांना मीळाले नाही. याची दखल घेत आयटक संघटनेचे शिष्टमंडळ दि. 14 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे , यांची भेट घेऊन थकित मानधन लवकरात लवकर देण्यात यावे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेल्या जाहीर आश्वासनाप्रमाणे एक हजार रुपये मानधन वाढीचा जिआर काढण्यात यावा यासह इतरही मागण्याचे निवेदन मा.शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना देवून मागण्या निकाली काढण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली त्यावेळी मंत्रीमहोदय म्हणाले आपल्या निवेदनातील मागण्या वाचुन सोडविण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले तसेच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. संचितसिह देवल यांच्या सोबत व शालेय शिक्षण अप्पर सचिव मा.प्रमोद पाटील यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करून इंधन बिल,मानधन या बाबतीत चर्चा केली.यावेळी केंद्रा कडून अजूनही निधी प्राप्त झाला नाही त्या बाबतीत पाट पुरावा सुरू असून जानेवारी अखेरीस सर्व थकीत इंधन बिल मानधन प्रत्येक जिल्ह्यात वर्ग करणार असल्याचे शालेय शिक्षण मुख्य सचिव, व अप्पर सचिव यांनी सांगितले आहे तसेच मानधन वाढ प्रस्ताव लवकरच शिक्षण मंत्री मा.दादा भुसे यांच्या सहमतीने मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सादर करणार असल्याचे मान्य केले आहे.यावेळी आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे राज्यकार्याधक्ष कॉ.भगवान पाटील,राज्य उपाध्यक्ष कॉ.दिवाकर नागपुरे,राज्य संघटक कॉ.हिम्मतराव गवई राज्य कमेटी सदस्य माधवराव पाटील,कॉ. विठ्ठल सुळे रोहीनी कोकरे, वर्षाताई शिंदे, कल्पना नगारे, मंगला श्रीरामे, जयश्री सपकाळ ,यांच्यासह महीला बघीनी उपस्थित होत्या.