न्यू इंग्लिश हायस्कूल येथे मकरसंक्राती उत्सव संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 17 जानेवारी रोजी मराठी पौष महिन्यातील मकरसंक्राती उत्सव साजरा करण्यात आला.. यावेळी शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात येऊन.. पौष महिन्यात तिळगुळाचे काय महत्व आहे.याबद्दल संस्था सचिव व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. अर्चनाताई धर्मे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली..शाळेतील मकरसंक्राती उत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विजय कचरे उपमुख्याध्यापक सुरेश कोवे पर्यवेक्षक सूचित बेहरे यावेळी मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील सर्व महिला शिक्षिका, शिक्षक, व विद्यार्थ्यांनी यांनी यावेळी सहकार्य केले