शिवराज्य वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी गुलाम गौस यांची निवड

वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी, सिमेंट खदानी, गिट्टी खदानी आहेत. या खदानी मध्ये अनेक वाहतूकदार वाहतुकीकरिता आपला व्यवसाय करीत असतात. मात्र जिल्यातील स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक वाहतूकदारांनी या संदर्भात आपल्या वेथाही अनेकदा बोलून दाखवल्या या वाहतूकदारांच्या समस्याचे निवारण करण्याकरिता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दिकी यांची निवड करण्यात आली. शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवराज्य वाहतूक सेनेचे शिवसेना लोकसभा गटनेते उपनेते, प्रमुख सल्लागार राहुल रमेश शेवाळे , आता किरण मिलिंद जाधव उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष अब्दुल समद शेख यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहतूकदारांच्या संमतीने गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दिकी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबत मनिष भुसारी, शाहरुख पठाण, आलेख रट्टे, नितीन टेमुर्णे, शुभम ताकसांडे यांनी आभिनंद न केले आहे.