.

सहसंपादक: रामभाऊ भोयर
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय किन्ही जवादे येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी गावातील निरनिराळ्या महिला बचत गटाच्या महिला व युवती यांनी एकत्र येऊन विकास कार्यावर चर्चा केली.याआधी किन्ही गावातील ४० महिलांना अनुदानावर शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली.उर्वरित इच्छुक महिला व युवती यांचे साठी शिवणकाम विणकाम चे प्रशिक्षण देण्यासंदर्भात चर्चा झाली.महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शाळेसाठी लागणारे गणवेश,सण उत्सव साठी लागणारे झेंडे तयार करण्याचे प्रशिक्षणाचे नियोजन ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे असे सरपंच सुधीर पाटील जवादे उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य प्रसाद निकुरे ग्रामपंचायत सचिव राजु निवल, यांनी सांगितले.यावेळी पुंडलिक लोणबले, मारुती विटाळे, दुर्गाबाई वडते, आशा कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे महिला दिन उत्साहात साजरा होत ढेकणे, प्रियांका उईके, चंदाताई मुंडाली मंगला मोहर्ले सिमा उईके,माला लोणबले,व अनेक महिला उपस्थित होत्या.
