


महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या कामगारांसाठी असलेल्या विविध योजनाच्या लाभ मिळाव्या यासाठी वरोरा तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले.त्यासाठी काही खासगी संस्था एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत लाभार्थ्यांकडून वसूल करत वरोरा शहरात आज किचन सेट वाटप करण्यात येईल असे मॅसेज द्वारे लाभार्थ्यांना सांगण्यात आले.त्यामुळे लाभार्थी महिला पुरुषांची पहाटे 5 वाजतापासून रेल्वे स्टेशन रोड कडे असणाऱ्या संस्थेच्या ऑफिस कडे गर्दी जमली .
बघता बघता ही गर्दी हजारोच्या संख्येत गोळा झाली.ना कुठली व्यवस्था ना कुठली सुविधा मग अशा परिस्थितीत किचन सेट वाटप करण्याचे अधिकार खासगी संस्था कसे हा एक महत्त्वाचा प्रश्न.
