
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अंतरगाव केन्द्र शाळेमध्ये निपुण कृती कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 29/03/2025 ला शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमा अंतर्गत पायाभूत स्तरावरील विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, संख्या ज्ञान क्षमता विकसित करणे यावर आधारित एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य राजेश शर्मा , राज्यस्तरीय सुलभक व अंतरगाव केन्द्राचे केन्द्र प्रमुख, लक्ष्मणराव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा स्तर सुधारणेसाठी करावयाच्या उपाययोजना योजना यावर पीपीटी च्या माध्यमातून कु.शुभदा येवले , जिल्हास्तरीय सुलभक यांनी सविस्तर माहिती शिक्षक व शिक्षिका यांचे समोर कथन केली.कश्यापध्दतीने विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढवायचा यावर गटचर्चा करण्यात आली.स्काफ मानके कशी भरायची यावर सर्व प्रश्नांचे निराकरण करुन शिक्षक परिषदेची सांगता झाली.
