
. ढाणकी प्रतिनिधी. प्रवीण जोशी
उ.बा.ठाकरे शिवसेनेच्या वतीने ०२/०४/२०२५ रोजी नगरपंचायतला सुभाष वाईन बार ते गजानन जिल्हावार यांच्या घरापर्यंत झालेला रस्ता अवघ्या तीन-चार महिन्यातच चाळणी झाला असून तो नव्याने करण्यात यावा या संदर्भात शिवसेनेच्या वतीने रीतसर निवेदन दिले होते. परंतु सदर रस्त्याची अद्याप दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव अखेर उ.बा.ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज डफली बजाव आंदोलन केले होते. आंदोलन तगडपल्लेवार चौक ते नगरपंचायत च्या दरबारात येऊन ठेपले मात्र नगर पंचायत मुख्याधिकारी गैरहजर असल्यामुळे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. मुख्याधिकारी येईपर्यंत नगरपंचायत विरोधात घोषणाबाजी सुरूच होती. मुख्याधिकारी आल्यानंतर संतप्त शिवसेनेच्या वतीने आपल्या नगरपंचायत ला सदर रस्त्याविषयी आज डफली बजाओ आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते मात्र अद्याप नगरपंचायत कार्यालयाची उघडण्याची वेळ दहा वाजताची असताना बारा वाजून गेले तरी, अद्याप मुख्याधिकारी हजर नसल्यामुळे मुख्याधिकारी आल्यानंतर मात्र चांगले धारेवर धरले होते. त्यातच सदर रस्त्या विषयी मुख्याधिकारी यांनी कोणती ठोस भूमिका घेतली व ठेकेदारावर काय कार्यवाही केली ते कागदोपत्री दाखवा या भूमिकेवर शिवसेना ठाम होती. काही वेळाने यात तोडगा काढण्यात आला व शेवटी सदर रस्ता केंव्हा दुरुस्त होईल पत्रकाद्वारे लेखी आश्वासन देण्यात आले. सदर रस्त्याचे काम हे पुढील १५ दिवसाच्या आत सुरु करण्यात येऊन दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने करण्यात येईल. दोष दायित्व निवारण कालावधी पूर्ण होईपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील न केल्यास नगर पंचायत कार्यालयाची राहील.
सदर रस्त्याविषयी रीतसर निवेदन देऊन सुद्धा आंदोलन नगरपंचायत कार्यालया समोर सुरू असून मुख्याधिकारी कार्यालयाची वेळ दहाची असताना बारा वाजून गेले तरी, सुद्धा मुख्याधिकारी आले नव्हते. ते जरी कर्मचारी असले तरी, मुख्याधिकारी काय तर प्रशासनाचा कोणताही कर्मचारी ते जनतेचे सेवक आहेत.तसेच सदर रस्त्याविषयी मुख्याधिकाऱ्यांनी पंधरा दिवसाचे आत योग्य पद्धतीने रस्त्याचे काम केले जाईल लेखी स्वरुपात पत्र दिले असून आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे , पंधरा दिवसाचे आत रस्ता न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. झालेल्या नुकसानीस कोणता ही शिवसैनिक न राहता यास जबाबदार नगर प्रशासन राहील
उ.बा.ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी उपसभापती संजय कुंभरवार.
