
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा आयटकच्या वतीने आज दि.20 में 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चा श्रमशक्ती भवन आयुर्वेदिक दवाखाना यवतमाळ येथुन घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष केंद्रित करत जिल्हा परिषद मार्गे संविधान चौक, दत्त चौक नेताजी मार्केट, शहर पोलीस स्टेशन, पाचकंदील चौक मार्गे महात्मा फुले पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मा. मुख्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य, व मा. पंतप्रधान, भारत सरकार यांना मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्फत मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले आयटक सह कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाद्वारे संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन
महाराष्ट्र राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांच्या वतीने मागण्या आपणाकडे शासन दुर्लक्ष करीत आहेत. तसेच सरकारच्या कामगार-कर्मचारी विरोधी, जनविरोधी व देश विरोधी धोरणाच्या विरोधात राज्यस्तरावर तसेच श्रमिकांच्या विरोधात धोरणे अंमलात आणणे बंद करावे. यासह आयटक यवतमाळ जिल्हा इतर मागण्या1) कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसं हिता रद्द करा.2) महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा करण्याचे ठरविले आहे. तो कायदा संविधान विरोधी आहेव सरकार विरोधी आंदोलन दाबण्याचा व अभिव्यक्ती विरोधी आहे तो मागे घ्यावा3) केंद्र सरकारचे राष्ट्रीय संपत्ती व सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण व विक्री करण्याचे धोरण मागे घ्या, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनचे धोरण रद्द करा.4) NHM मधील गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देवून आरोग्य विभागात समायोजन करा, कंत्राटी कर्मचारीबाबत महाराष्ट्र शासनाने पाठविलेला प्रस्ताव केंद्रसरकारने मंजूर करावा 5)शासकीय, निमशासकीय विभाग, नगरपालिका, महापालिका व खाजगी उद्योग व आस्थापनां मध्ये हंगामी, कंत्राटी, रोजंदारी व मानधनावरील आयसीडीएस मधील अंगणवाडी, NHM मधील आशा स्वयं सेविका, शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कर्मचारी (स्वयंपाकी -मदतनीस), आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचर इत्यादी कर्मचारी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांना कायम करा व कायम करेपर्यंत सर्वांना किमान वेतन रू. २६,०००/- दरमहा मानधन/वतन द्या.
6) महाराष्ट्र शासनाचा आऊट सोर्सिंगद्वारे नोकर भरती करण्याचा शासन निर्णय रद्द करा. कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या व विविध मंडळावर कामगार संघटनां चेप्रतिनिधी घ्या.7) आठ तासाच्या कामासाठी दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन निश्चित करा.8) असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवा शर्ती व पेन्शन, विमा, इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी माथाडीचे धरतीवर कल्याणकारी मंडळस्थापन करा व योजनांसाठी निधीची तरतूद करा.9) सर्व नागरिकांना (ईपीएफ पेन्शनधारकांसह) दरमहा दहा हजार रुपये किमान पेन्शन लागू करा व सरकारी कर्मचाऱ्यांनाजुनी पेन्शन योजना लागू करा.10) महागाई रोखा, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा, रोजगार निर्माण करण्यासाठी योजना आखा, बेरोजगारा ना बेरोजगार भत्ता द्या.11) गरीब व मध्यम शेतकरी आणि शेतमजुरां चेसं पूर्णकर्ज माफ करा.12) विज कंपन्यांचे खाजगीकरण करू नका सर्व विज कंत्राटी कामगारांना उर्जा उद्योगात कायमकरा इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी कॉ.विजय ठाकरे,कॉ.दिवाकर नागपुरे, कॉ.विलास ससाने, संजय भालेराव, सुनिता कुंभारे, अर्चना कडुकार ,प्रतीभा ठाकरे, शंकरराव कदम, मोहन आडे, कुसुम मानकर, शशीकला मेंढे, बेबी ठाकरे, ल्याकत बी , मंजुशा वनकर, ललीता झाडे, निर्मला कन्नमवार,छबुताई इंगोले, विजया तायडे, उज्वला पाझारे, बबीता चिंचोळे, किरण कांबळे, समशाद पठाण, गंगाबाई हुमे, गुंफा गेडाम, सुनंदा कांबळे, विद्या पटेलपैक , संध्या मोहुर्ले, ममता घनमोडे , अश्विनी वाढई, वणीता चौधरी,योगीता मुळे,वनमाला मेश्राम सुरेश गायकवाड रामधन जाधव, यासह मोर्चात गटप्रवर्तक,आशा,स्त्री -परिचर, स्वयंपाकी मदतनीस, शेकडो महिला पुरुष कामगार , कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते
