
सहसंपादक : रामभाऊ भोयर
हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून या हंगामात हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शेतकरी कुटुंबातील महिला चक्क अंगावरचे दागिने मोडून टाकतात तसेच चित्र यंदाही कायम असून सोने चांदी खरेदीच्या तुलनेत मोडीचे प्रमाण सध्या जास्त दिसून येत आहे. राळेगाव तालुका आदिवासी बहुल भाग असून ७० टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून राळेगाव तालुक्याची निर्मिती होवून चाळीस वर्षानंतरही एकही उद्योग धंदा किंवा कारखाने नाहीत मुख्य व्यवसाय शेती असून विशेषतः खरीप हंगामावर सर्व शेतकऱ्यांचे पुढील वर्षभराचे अर्थ चक्र विसंबून असते या
हंगामात पेरणीलायक असलेले एकरभरही क्षेत्रही पेरणी विना रिक्त ठेवले जात नाही मात्र पूर परिस्थिती उद्भवण्यासह अतिवृष्टी होऊन शेत जमीन खरडून जाणे पेरणी झाल्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारणे किंवा अधिक पाण्याने जमीन चिबडून पेरणी उलटणे पुराचे पाणी शेतात शिरून पेरलेले किंवा अंकुरलेले बियाणे वाहून जाणे आधी स्वरूपातील संकटे देखील याच हंगामात शेतकऱ्यांना उभे ठाकतात यावर्षी देखील अशा संकटाने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता पण सोयाबीन भरणीच्या वेळी रोगाचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीन मध्ये मोठी घट झाली तर कधी सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे हजारो क्विंटल सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले मात्र अशाही बिकट स्थितीत शेतकऱ्यांनी हिम्मत सोडलेली नाही. आदी अडचणीवर मात करून पुन्हा त्यांनी खरीप हंगामात झालेले तूट भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात तीळ मुंग शेंगदाणा ज्वारीआधी पिकाची लागवड केली परंतु निसर्गाने शेतकऱ्यांनी पाठ सोडली नाही आणि ऐन पिक काढणीला येत असतानाच मे महिन्यापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला व रब्बीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले मात्र या पिकातूनही शेतकरी सावरलेला नाही त्यातच कापूस सोयाबीन ला पाहिजे तेवढे भाव नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले एवढे असतानाही पुन्हा एक वेळ ते यंदाच्या खरीप हंगामासाठी सज्ज झाले आहेत त्याचे मनोबल वाढविण्याकरता तथा आर्थिक संकटात सदैव साथ देण्याचे जणू वचन देत शेतकऱ्यांच्या बायका अंगावरील दागिने मोडून घर धन्याच्या मदतीला पुन्हा एकदा सक्षम पणे पुढे आल्याचे चित्र दिसून येत या तरी वर्षात भरभरून उत्पादन होईल या आशेने पेरणी साठी शेतकरी सज्ज झाला असून दरम्यान पेरणी लाईक दमदार पाऊस होऊन किमान यंदा तरी विक्रमी उत्पादन हाती पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे
