
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भरधाव जाणाऱ्या कंटेनर वाहनाची कंटेनरला समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला.ही घटना दि ८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील कारेगाव कट पॉईंट जवळ घडली.मिळालेल्या माहितीनुसार नागपूरकडून एन एल ०१ एजे १११५ या क्रमांकाचा कंटेनर ट्रक पांढरकवडा मार्गे जात होता.तर पांढरकवडा येथून एच आर ५५ ए डब्ल्यू ०१२१ या क्रमांकाचा कंटेनर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु असल्याने नागपूर कडे विरुद्ध दिशेने जात होता.यावेळी नॅशनल हायवे क्र ४४ वरील कारेगाव कट पॉईंट जवळ येताच दोन्ही कंटेनर वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, या अपघातात एका कंटेनर ट्रकचा समोरील भाग चकनाचुर झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र एच आर ५५ ए डब्ल्यू ०१२१ या ट्रकचा चालक वकील मोहम्मद खान वय २६ वर्ष रा. महालुका हरियाणा हा गंभीर जखमी झाला आहे.अपघात घडताच महामार्गावरील एन एच आय ची चमू त्वरित दाखल होऊन जखमीला उपचारासाठी वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.
