
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मा. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २४ जुलै रोजी शेतकरी कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांग मानधनाच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. मेटीखेडा येथे हे आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षासोबतच काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), उबाठा, बंजारा गोर सेना यांसारख्या विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान वडगाव (जंगल) पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे व पोलीस कर्मचारी वर्गाने योग्य बंदोबस्त ठेवत आंदोलकांना सहकार्य केले.
या आंदोलनासाठी अनिल राजगुरू (नायब तहसीलदार, अप्पर तहसील मेटीखेडा) यांनी निवेदन स्विकारले. शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव (किमान आधारभूत किंमत) व दिव्यांग व्यक्तींना दरमहा ₹६००० मानधन मिळावे, या प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.आंदोलनात सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि कष्टकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्वपक्षीय असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
या वेळी विशाल सरोदे, विजय तेलगे, विरेंद्र चव्हाण, शंकर बगमारे, गुरुदेव राऊत, गजानन पंचबुध्ये, सुधाकर निखाडे, मेंहदी शेठ, विजय सरोदे, संजय कोहीचाडे, अमोल खडसे, प्रवीण ढाकुळकर, बंडू वाघाडे, पवन जाधव, प्रशांत भोयर, मनोज राठोड, रवी चिंचाळकर, नारायण चव्हाण, सूरज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
