
प्रतिनिधी/शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील सोनदाभी येथील ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरु असलेली घरकुलाची योजना यामध्ये पैशाच्या लोभापाई मिदोंडे या लाभार्थ्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या आकाउंटमध्ये न टाकता परस्पर दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकल्याचे आरोप करण्यात आला असून लाभार्थ्यांच्या घरकुलामध्ये झालेल्या पैशाची अफरातफर व भ्रष्टाचाराची चौकशी करुन ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये पं.स. येथे शिवसेनेच्या वतीने डफली बजाय आदोलन करण्यात येईल व या निवेदनाची दखल घेऊन लेखी स्वरुपामध्ये चोकशीचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना दिला असून सोबत
पैशांची अफरातफर झालेले पुरावे सुद्धा देण्यात आले आहे.
