
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*.*
१ आक्टोंबर २०२५ ला आदिवासी मुलांना आपल्या हक्कासाठी आता आपल्यालाच लढावं लागेल आणि रस्त्यावर उतरून आदिवासी आरक्षण बचाव करण्यासाठी ” क्रांतीकारी उठाव ” करण्यासाठी येत्या १० आक्टोंबर ला मोर्चा त सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आले होते.* या आरक्षण बचाव मोर्चा साठी मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना आरक्षणावर काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या, राजकीय पुढारी, आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंग गिळून गप्प बसले आहे, आणि आता ही आरक्षणाची लढाई आपल्या अस्तित्वाची आहे म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरून आपले शक्ती प्रदर्शन केल्या शिवाय पर्याय नाही, हैदराबाद गॅजेट्स च्या भ्रमित केलेल्या राज्य सरकारने समाजा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे आणि इतर समाज आदिवासी समाविष्ट होते की काय अशी शंका आदिवासी समाजात निर्माण झाली आहे म्हणून आम्ही समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी, “आरक्षण बचाव महामोर्चा ” चे आयोजन केले आहे या मोर्चात आदिवासी विद्यार्थ्यांनी ” आदिवासी स्वयंसेवक” सेवा देण्यासाठी तयारी दाखवली आदिवासी विद्यार्थी समाजाच्या रक्षणासाठी सहभागी होत आहेत, असे मतं राजु चांदेकर जिल्हा अध्यक्ष यांनी व्यक्त केले *आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चा हा जिल्हा स्तरावर लाखो च्या संख्येने होतं आहे सर्व सोळा तालुक्यातील आदिवासी समाजातील लोकांपर्यंत या महामोर्चा चा संदेश पोहोचला आहे म्हणून सर्व तालुका कृती समिती जिल्हा कृती समिती आणि सर्व स्वयंसेवकांनी हा मोर्चा शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यासाठी मा राजु चांदेकर, जिल्हा अध्यक्ष आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ आणि मा मधुसूदन कोवे गुरुजी जिल्हा प्रवक्ते, आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ यांनी केले आहे
