
वरोरा:- वरोरा तालुक्यातील चिकणी गाव आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी मुख्य बाजारपेठ या गावात मागील काही महिन्यांपासून या गावात अवैध बनावट दारूची विक्री मोठया प्रमाणात सुरू असल्याने काही महिन्यांपासून आलेल्या बीट जमादारामुळे ही विक्री मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
वरोरा तालुक्यातील चिकणी, डोंगरगाव, महाडोळी, मसाळा, बोपापूर, शेगाव अश्या अनेक ठिकाणी अवैध बनावट दारूची विक्री सर्रासपणे सुरू असून या संपूर्ण प्रकाराला दारू उत्पादन शुल्कातच नाही तर पोलीस विभागाचाही पाठिंबा आहे. महिन्याकाठी भली मोठी रक्कम पोलीस विभागातील एक कर्मचारी वसुली करीत असल्याचेही नागरिकांत द्वारे सांगितले जाते .एकंदरीत पाहता या अवैध विक्रीला या बीटातील जमादार पोलीस कर्मचारी हे बळ देत असल्याने हा अवैध दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चिकणी या गावांमध्ये सुरू आहे या संदर्भात काही वर्षाआधी महिलांनी मोठ्या प्रमाणात या विरोधात एलगार उभारला होता मात्र ही मोहीमही आता थंड झाले की दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी बीड जमादारावर कारवाही करून येथे सक्षम पोलीस अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी आता जोर धरीत आहे.
