
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे श्री सद्गुरु अनंत महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम २३ नोव्हेंबर रोजी रविवारला आयोजित केला आहे.सदर कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे दुपारी ३ ते ५ गुरुदेव सेवा मंडळ रिधोरा यांचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ५.३० वा. सामुदायिक प्रार्थना, ६.३० ते ७ वा. प्रवचन गुरुभक्त श्री भास्कर पारखी , ७ ते ७.३० वा. प्रवचन गुरुभक्त श्री रमेश सातपुते,७.३० ते ८.३० वा. किर्तन गुरुभक्त श्री रमाकांत पांढरे महाराज तर ८.३० ते १० वा. किर्तन श्री सद्गुरु अनंत महाराज सकल संत निर्णय ज्ञान मंदिर कुंभा ता. मारेगाव यांचे सुमधुर वाणीतून रिधोरा येथे विठ्ठल रुक्माई मंदिर तिथे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सदर वरील सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घेण्याचे आव्हान अखिल गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गुरुभक्त मंडळी व गावकरी मंडळी रिधोरा यांनी केले आहे
