
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धचे 2 नोव्हेंबर पासून जि. प. उ. प्रा. शाळा रावेरी येथे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय स्पर्धेमध्ये 2 Hospitals ला प्राथमिक व 3 नोव्हेंबर ला उच्च प्राथमिक गटात सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धेचे केंद्रातील शाळा व मुलांची शाळा, रावेरी शाळा यांच्या संयुक्त विध्यमाने करण्यात आले.
शाळेच्या मागील ग्राउंड वर या स्पर्धा घेण्यात येतं आहे. केंद्रस्थरीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्न सरपंच राजूभाऊ तेलंगे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षीय स्थानी शा. व्य. सं. उपाध्यक्ष पुरुषोत्तम हिवरकर होते, प्रमुख मार्गदर्शक केंद्रप्रमुख कल्पना डवले मॅडम उपस्थित होत्या.रावेरी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र एकोणकर, भारती ताठे, प्रताप ओंकार, मनीषा ताम्हणं, सुहासिनी खेरडे, हरिभाऊ मांडवकर, जयश्री पोटे, आगरकर मॅडम आदी सह केंद्रातील शिक्षकवृंद उपस्थित होते.
केंद्र प्रमुख कल्पना डवले यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून खेळ, क्रीडा स्पर्धा चे शालेय जीवनातील महत्व या विषयावर भाष्य केले.विविध दाखले देत त्यांनी मुलांना आनंदाने, मनमोकळेपणाने खेळा असा संदेश देखील दिला.कार्यक्रमाचे प्रास्तविक पर मनोगत व्यक्त करतांना गुजरी शाळेचे मुख्याध्यापक कुणाल सरोदे यांनी उत्कृष्ट आयोजना बाबत सर्व शिक्षक वृंदाबाबत , शाळेचे व आयोजन समिती बाबत गौरवोदग्गार काढले. या वेळी प्रक्रम ‘क ‘मुले, मुली यांचे कब्बडी, खो -खो, लंगडी, वैयक्तिक सामने यात विध्यार्थ्यांनी लक्षवेधक कामगिरी करून उपस्थितांची दाद मिळवली. केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन अमोल पोहणकर यांनी केले.
