

प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा
राजुरा:- राष्ट्रीय सेवा योजना पथक श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वरुर रोड या आपल्या स्वगवात १ डिसेंबर (AIDS) जागतिक एड्स दिनानिमित्त घरोघरी फिरून एड्स बद्दल जागरूकता निर्माण केली. एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी (UNI) आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी माहिती दिली जाते. जागतिक एड्स दिन म्हणजे एच. आय. व्ही. एड्स बद्दल जागरूकता पसरविण्यासाठी पाळला जाणारा दिवस.एड्स सारख्या जीवघेण्या रोगांबद्दल जागरूकता पसरविण्याची मोहीम अनेक वर्षांपासून सुरू आहे. एड्स हा रोग जीवघेणा यासाठी आहे कारण या रोगाचे जिवाणू थेट आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात त्यामुळे इतर अनेक आजार होण्याचा संभव असतो. एड्स झालेल्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी.) होण्याची शक्यता जास्त असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दरवर्षी हा उपक्रम स्वयंसेवक आपल्या स्वगावात राबवून जागरूकता निर्माण करत असते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशाल शेंडे, प्रतिक डाखरे, अश्विनी उरकुडे, रुपाली आस्वले, मयुरी वडस्कर उपस्थित होते.
