
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अड्याळ टेकडी: दि १५ मार्च २०२६ ला भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे गुरुदेव सेवा मंडळ महिला कार्यकर्ता सम्मेलन पार पडले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सुश्री रेखाताई कार्याध्यक्ष अड्याळ टेकडी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाताई काकडे यांनी केले. सदर संमेलनात चंद्रपूर , भंडारा , नागपूर , गडचिरोली , वर्धा इत्यादी जिल्ह्यामधील विविध गावातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला व कार्य अहवाल सादर केला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उषालाई किनगे प्रमुख मार्गदर्शक सुबोधदादा संचालक भू-वैकुंठ वैकुंठ अड्याळ टेकडी उपस्थित डॉ. नवलाजी मुळे अध्यक्ष भू वैकुंठ अड्याळ टेकडी, मार्गदर्शन माधूरीताई नखाते यांनी महिला सक्षमीकरण, ग्रामसभा, आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. आ. बेबीताई काकडे यांनी व्यसनमुक्ती निर्मुलन या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात प्रामुख्याने टिळक नगर ब्रम्हपुरी, निमगाव, चोरटी, हत्तीलेंडा , गोगाव, वाकडी, पांढरवाणी, उमरेड, शिरसपुर कुडेगाव, मोखारा ,मांदेड, चौगान चंद्रपूर, डोंगरगाव, कोसबी, नागपूर, उश्राळमेंढा , शुशि, नान्होरी, सावर्ला , लोहारा, लाखापुर , किरीमिटी, अड्याळ, नागपूर, नागभिड , खैरगांव इत्यादी गावातील महिलांनी सहभाग घेतला. या सम्मेलनात महिलांच्या बाबतीत अनेक विषय जसे की आरोग्य, शिक्षण, संगठण, व्यसनमुक्ती, स्वयंपाकशास्त्र, गर्भसंस्कार, ग्रामसभा या विषयावर आ सुबोध दादा यांनी मार्गदर्शन केले. कुमारी आरती व पुजा यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. आभार प्रदर्शन लक्ष्मीताई गुरुनूले यांनी केले. शेवटी राष्ट्रवंदना व प्रमाणपत्र वितरण करुन क्रार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
