
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारतीय संस्कृतीच्या जतन व प्रसारासाठी कार्यरत असलेल्या शांतिकुंज, हरिद्वार यांच्या वतीने आयोजित भारतीय संस्कृति ज्ञान परीक्षा मध्ये सम्राट सुरज फुलमाळी याने महाराष्ट्र राज्यात 3 री रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सम्राटच्या या यशामुळे केवळ त्याच्या कुटुंबाचेच नव्हे, तर श्री महावीर कॉन्व्हेंट व संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांविषयी असलेल्या त्याच्या अभ्यासू वृत्तीमुळे हे यश शक्य झाले आहे.अशा स्पर्धात्मक परीक्षेत राज्य पातळीवर अव्वल स्थान मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब असून, सम्राटचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सम्राटच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत.
