
पाण्यात उतरताना निष्काळजीपणा नको; अपघात टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन
(प्रतिनिधी) शेख रमजान
सध्या शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने लहान मुले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात तळे, नदी, नाले, कॅनॉल आणि धरण परिसरात पोहण्यासाठी जात आहेत. ही बाब लक्षात घेता, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी नागरिकांना आणि विशेषत पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
ठाणेदार शिंदे यांनी सांगितले की, सुट्ट्यांच्या काळात मुलांच्या हालचालींकडे पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लहान मुलांना विहीर, कॅनॉल किंवा खोल पाण्याजवळ एकटे जाऊ देऊ नये. अनेकदा कॅनॉलचे काठ तीव्र उताराचे आणि शेवाळयुक्त असल्याने तिथे पकड मिळत नाही. तसेच पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने अशा ठिकाणी पोहणे जीवघेणे ठरू शकते.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना
पालकांचे नियंत्रण: पोहता येत नसलेल्या मुलांनी कोणत्याही परिस्थितीत पाण्यात उतरू नये. मुलांसोबत घरातील मोठी व अनुभवी व्यक्ती असणे अनिवार्य आहे.
धोकादायक ठिकाणे टाळा: शेवाळलेल्या किंवा घसरड्या भागात पाय घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त असते, अशा ठिकाणी जाणे टाळावे.
व्यसनाधीनता टाळा. मद्यपान किंवा कोणत्याही नशेत पाण्यात जाणे अत्यंत धोकादायक असून ते जीवावर बेतू शकते.
तातडीची मदत. कोणतीही दुर्घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने मदत करावी आणि पोलीस प्रशासनाच्या ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.
उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेताना निष्काळजीपणामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी बिटरगाव पोलिसांनी दिलेल्या या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या
