
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शिक्षण क्षेत्रातील निस्सीम सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा गौरव म्हणजे समाजाचा गौरव होय. राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उंदरी येथील उपक्रमशील शिक्षक धनराज कचरे यांना २०२५-२६ सालचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार ध्येय फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला पुणे निगडी येथील ग. दि माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या एज्युकेशन आयकॉन समिट 2026 या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते श्री धनराज रामराव कचरे यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन
गौरवविन्यात आले. उपस्थित शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून निवड प्रक्रिया नंतर प्रत्येक तालुक्यातून केवळ एका शिक्षकाची निवड करण्यात आली होती. राळेगाव तालुक्यातून श्री धनराज कचरे यांनी आपले उत्कृष्ट अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नैतिक मूल्याची जोपासना आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमामुळे हा सन्मान पटकावला केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक कृती निर्माण करणे तसेच सामाजिक जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या आणि शैक्षणिक गुणवत्तेची दखल शासनाच्या प्रशिक्षण पुस्तिकेत राज्यस्तरावर घेण्यात आली आहे यापूर्वी त्यांना जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने आणि शिक्षण विस्तार अधिकारी निलेशजी दाभाडे साहेब शाळेचे मुख्याध्यापक माजी विद्यार्थी माता भगिनी कडून अभिनंदन करण्यात येत आहे.
