
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सकल आदिवासी समाज संघटन राळेगाव या संघटनेचे बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी दिनांक मंगळवार 7 एप्रिल 2026रोजी तलाव गार्डन नगरपंचायत येथे सायंकाळी पाच ते आठच्या दरम्यान सभा घेण्यात आली .राळेगाव शहर व गाव पातळीवरील समाज प्रेमी व कार्यकर्ते यांचे महत्त्वपूर्ण उत्साही वातावरण सभा संपन्न झाली ,या सभेचे आयोजक व मार्गदर्शन कर्ते श्री महेश भाऊ कोडापे (आर,आर,एस) (सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर सेंटर एक्साईज अँड कस्टम मुंबई )यांनी केले सभेचे अध्यक्ष स्थान श्री विठोबाजी कोवे प्रमुख अतिथी म्हणून शितल कुळसंगे मॅडम यांनी भूषवले या प्रसंगी उपस्थित समाज प्रेमी व कार्यकर्ते मंडळ यांच्यातील समाज हितांच्या विरुद्ध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली, व संवाद ,साधण्यात आला आणि सर्वांनी आपापले विचार मांडले .तसेच समाजासाठी विकासात्मक धोरण उपक्रम विविध कार्यक्रम इत्यादी राबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित होऊन समाजामध्ये कार्य करणे गरजेचे आहे, या विषयावर उपस्थितानी मार्गदर्शन केले, या महत्वपूर्ण बैठकीला एकत्र येण्याचा उद्देश काय? याबाबत प्रास्ताविक माननीय मधुकरजी गेडाम (सर)(सेवानिवृत्त तहसीलदार राळेगाव )यांनी आदिवासी समाजाचे प्रगती व परिवर्तन करणे बाबत प्रास्ताविक मार्गदर्शन केले, या बैठकीला उपस्थित सर्व श्री,अरविंदजी के राम, अरुण को डापे, वसंतराव सोया म ,वाल्मीक मेश्राम ,श्री ,काळे (गोपाल सर नगर )महेश मडावी, दिनेश करपते ,निलेश शिवरकर, जीवन मेश्राम ,आकाश मेश्राम, मारोतराव शेडमाके ,सुनील सूरपाम,शंकर तोडाचे, गजानन मेश्राम, अंकुश कुळसंगे,(पत्रकार) रामभाऊ कुड मते, भूपेंद्र चांदेकर रजनीकांत परचाके ,विवेक कुमरे,रवी मेश्राम ,प्रकाश मेश्राम कविता धुर्वे (पत्रकार) स्वाती मेश्राम वंदना मेश्राम वंदना, किंनाके ,शितल कुळसांगे,इत्यादी कार्यकर्ते मंडळी या सभेला उपस्थित होते, या सभेचे आयोजन सूत्रसंचालन मार्गदर्शन, श्री महेश सर यांनी केले ,आभार प्रदर्शन कविता धुर्वे यांनी केले .या सभेमुळे सर्व, आदिवासी समाजामधील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला असून आपण सर्व मिळून आपला समाज एकजूट करणे साठी कार्यरत,असे या सभेला असा संकल्प करण्यात आला.
