
सहा गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
कळंब तालुक्यातील सावरगाव, परसोडी [बु], टालेगाव, पिंपळखुटी, माटेगाव, चिंचोली या 6 गावांतील शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बुस्टर, इनोवेज, महादेव या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 23-जून 2026 ते दि. 28जून 2026 दरम्यान नगदी पैसे देऊन सदर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी करण्यात आली. 10 ते 12 दिवसात उगवण होणे अपेक्षित असताना 100% बियाणे उगवलेलेच नाही. यामुळे पेरणीचा संपूर्ण खर्च व मेहनत वाया गेली.
बाब गंभीर असल्याने आज शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी, कळंब यांना लेखी तक्रार देऊन बाधित क्षेत्राचा त्वरित पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
कंपनी प्रतिनिधींना संपर्क साधूनही 8 दिवस उलटूनही कोणीही पाहणीसाठी आले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी मनोज बबनराव वानखेडे, महेश रमेशराव वानखेडे, नानाजी धुर्वे, योगेश धुर्वे, चंद्रशेखर वानखेडे, मोहन फाळे, खुशाल वैद्य, प्रेमचंद अलोणे, नंदू झांबरे, रामा कचरे, संजय फुलमाळी, आशिष वानखेडे, श्याम सोनाळे, लहुजी सोनाळे, बाळू कचरे, शंकर कचरे, ईश्वर कचरे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
