
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी
,…………………………….
हिमायतनगर तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रगती लोक संचलीत साधन केंद्र किनवट अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्याचा स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम प्रगती लोक संचलीत साधनं केंद्र गेले दहा वर्षांपासून काम करीत आहे आज हिमायतनगर तालुक्यात जवळपास महिला बचत गटांना पापड गिरणी असो किंवा पिठ गिरणी तर काही घटना खवा मशीन देखील या योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे हिमायतनगर आज रोजी सरसम(बु) करंजी.वाळकेवाडी. टेंभी इत्यादी गावातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मंजूर करून देण्यात आले आहे त्यांना मार्गदर्शन.मा. जिल्हा समन्वयक चंदनसिह राठोड साहेब व.mrcचे संस्थापक श्री विशाल श्रोते साहेब ता समन्वयक सिंधू ताई यांच्या प्रयत्नातून महिला बचत गटांना अर्थसहाय्य मंजूर करून देण्यास मदत झाली त्यामुळे महिलांना बचत गटां मध्ये काम करण्याची प्रेणा मिळाली उत्सहाने काम करू लागले आहे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यास रची निर्माण झाली
घरातील स्वयंपाक करणे, मुलांचे डबे, घरातील साफ-सफाई ही गृहीणींची काही केली तरी न टाळता येणारी निकडीची कामेच म्हणता येतील ज्यातून काही केल्या सुटका नाही. मात्र ही कामे करूनही आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी महिला बचतगटांच्या माध्यमातून सिध्द करत आहेत. नोकरी न करताही कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यात आज महिला बचत गटातील सदस्यांचा वाटा खूपच महत्वाचा आहे असे आपल्याला सांगता येईल.बचतगटांच्या माध्यमातून महिला आपल्या क्षमता सिध्द करत आहेत यासाठी त्यांना मिळालं आहे ते हक्काचं व्यासपीठ म्हणजे बचतगट. अशाच प्रकारे दुग्धोत्पादनातून प्रगती साधलेल्या महिला बचतगटांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे येथील महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. २००२ मध्ये स्थापन झालेल्या या दारिद्रयरेषेखालील बचतगटाने आपल्या बचतीनंतर इतर उद्योगातून उत्तरोत्तर प्रगती साधत दोन लाखांच्या दुग्धोत्पादन व्यवसाय व पोषण आहारापर्यंत झेप घेतली आहे.
नम्रता माळगावकर गटप्रमुख असून उपगटप्रमुख म्हणून राजश्री घाडी व सचीव म्हणून नम्रता घाडी काम पाहतात. व्यवसायाच्या वेगवेगळया वाटा चोखाळत आज बचत गट ५० रूपयांच्या बचतीपासून स्वत:चा व्यवसाय करण्यापर्यंत आपली एक वेगळी ओळख करून देण्यासाठी धडपडत आहेत. आणि या धडपडीतून आज दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा येवू लागला आहे.महिलांचं आर्थिक परावलंबन कमी होत असल्याने कुटुंबाचे किंबहुना गावांचे एक एक वेगळेच चित्र डोळयासमोर येत आहे.ज्यातून गावांतील महिलांनाही उत्सहा निर्माण होऊ लागला आहे
