


प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
योगेश तेजे (कायर )
वणी तालुक्यातील घोन्सा येथील कोळश्याच्या खुल्या खदानीतील पाण्यामुळे नागरिकांचे व शेतकर्यांच्या पशुंचे आरोग्य धोक्यात येत आहे या खदानीतील पाणी मोठ्या पाईप लाईनने नाल्यात सोडल्या जात आहे हा नाला विदर्भा नदीला जावुन मिळतात त्यामुळे खदानीतील नाल्यावाटे सोडल्या गेलेले दुषित पाणी नदिला मिळत आहे या पाण्यात विविध रसायने मिसळल्याने संपुर्ण नदी प्रदुषित होत आहे नदीकाठावर कुभांरखणी परसोडा साखरा कायर नेरड पुरड कुन्ड्रा या सारखे अनेक लहान मोठाले गावे आहेत तर विदर्भा नदिचा व वर्धा या नद्यांचा संगम होत पर्यंत नदी काठावर चाळीस ते पंच्चेसाळीस गावे येतात तसेच या सर्व गावातील पाणी पुरवठा नदितुन असल्याने येथील नागरिकांना काँलरा डायरीया व इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यात शेतकर्यांची जनावरे या नदितील पाणी पित असल्याने त्यांच्या जनावराना सुद्धा विविध आजारांचे लक्षण आढळुन येत आहे त्यामुळे प्रशासनाने कोळसा खदानीतुन सोडल्या जात असलेले पाणी जनावरांना आणि नागरिकांना पिण्या योग्य आहे कि नाही याची तपासणी करण्याची आवश्यक आहे
