भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी . सुधाकर पाटील सोनारीकर यांची निवड

परमेश्वर सुर्यवंशी.. प्रतिनिधी

हिमायतनगर: तालुक्यातील सोनारी येथील सुधाकर पाटील सोनारीकर यांची भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस पदी खा. प्रताप पाटील चिखलीकर आ. राम पाटील रातोळीकर जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर अध्यक्ष किशोर देशमुख (युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रणितताई चिखलिकर देवरे यांच्या हस्ते स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन नांदेड येथे सुधाकर पाटील सोनारीकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
तालुक्यातील उपक्रमशील म्हणून सुधाकर पाटील यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली असून, तालुक्यासह जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आसल्याणे व भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सातत्याने सहभाग व हिमायतनगर तालुक्यातील विविध पदे योग्यरित्या भुषविल्यामुळे अगदी सरपंच पदापासून ते मार्केट कमिटी उपसभापती पदापर्यंत आपले वर्चस्व सिद्ध करुन तालुक्यात आपली छाप पाडली वपक्षाशी एकनिष्ठ राहुन विविध कार्यात आपल्या कर्तुत्वाचा वेगळा ठस्सा उमटवला . त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे व पक्षाची विचारधारा लक्षात घेऊन प्रदेश व जिल्ह्याने दिलेले कार्यक्रम राबवून आपल्या कार्यक्षेत्रात पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी त्यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी खा.प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आ.राम पाटील रातोळीकर, डॉ.संतुकराव हंबर्डे, चैतन्य बापू देशमुख, दिलीप कंदकुरते, माजी.आ. अविनाश घाटे, युवा जिल्हा अध्यक्ष ऍड. किशोर देशमुख, प्रणिता देवरे चिखलीकर आदी उपस्थित होते. त्याच बरोबर हिमायतनगर तालुक्यातील भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी शहर अध्यक्ष खंडु चव्हाण राम जाधव यल्लपा गुडेवार किशनराव वानखेडे इदाईत खान विनोद दुर्गेकर माधव पाटील करंजीकर राज गाडेकर आदि कार्यकर्त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या