भारत माता की जय … घोषणा देत हिमायतनगर तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा वंदे मातरम……


प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी


आज ७२वा प्रजासत्ताक दिन. आजच्याच दिवशी भारत लोकशाही,सार्वभौम,गणराज्य बनला. मात्र खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला मिळतील. आपण सर्व मिळून त्यासाठी प्रयत्न करू. अशा राष्ट्रीय सणांमध्ये एकत्रित येऊन एकसंघ येतो आज रोजी दि 26 जानेवारी2021 रोजी हिमायतनगर (वाढोणा) शहरामध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालय & संघर्ष सांस्कृतिक कला मंडळ हिमायतनगर (वाढोणा)जि.नांदेड च्या वतीने श्री डॉ. डी डी गायकवाड सर श्री.डॉ. माधव भुरके सर तसेच कला संचाचे प्रमुख श्री स.अखिल स.जलील (भाई)यांचे संच तसेच ग्रामीण रुग्णालय संपूर्ण स्टॉप यांनी आज रोजी ग्रामीण रुग्णालय येथे देशभक्तीपर गीताचा भव्य असा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला माझ्यासह माझे मित्र श्री डॉ.दिगंबर वानखेडे व शहरातील मान्यवर व्यक्तींना सह सर्व पत्रकार बंधू याना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शहरांमध्ये मोठे देशभक्तीपर गीतांचा सुरेख असा कार्यक्रम आज ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर (वाढोणा) येथे झाल्याचा आनंद सर्व लोकांमध्ये होता तसेच मी आज आयोजकांना व कला संचाच्या प्रमुखांना माझी विनंती की आपण दरवर्षी असा कार्यक्रम शासकीय रुग्णालय येथे घ्यावा त्यामुळे सर्व समाजामध्ये एकतेची भावना निर्माण होईल आशा समाज उपयोगी कार्यक्रमाला मला आयोजकांनी आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय कर्मचारी संघटना व संघर्ष सांस्कृतिक कला मंडळाचे सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !….आपलाचआशिष सकवानभाजपा तालुकाध्यक्ष व भाजपा परिवार हिमायतनगर* (वाढोणा)जि.नांदेड