भद्रावतीतील विद्यार्थ्यांचं दैदिप्यमान यश,४ विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातील टॉप इंजिनीरिंग कॉलेज मध्ये निवड

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा


यशवंतराव शिंदे कनिष्ठ विद्यालयातील ४ विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातील टॉप इंजिनीरिंग कॉलेज मध्ये निवड झाली .भाविक नैताम ह्या विद्यार्थ्यांची निवड इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि ,मुंबई येथे झाली.सदर कॉलेज मध्ये निवड झालेला हा भद्रवतीतील एकमेव विद्यार्थी ठरला आहे.हे कॉलेज रँकिंग मध्ये काही IITs , NITs चाही वरच आहे आणि याची कट ऑफ हि ९९% पर्यंत असते.कु. अमिषा खोब्रागडे ह्या विद्यार्थिनींची निवड लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मध्ये पेट्रोकेमिकल ब्रांच साठी झाली आहे,हे कॉलेज सुद्धा भारतातील टॉप कॉलेज पैकी एक आहे आणि याची हि कट ऑफ खूप जास्त असते. ह्या कॉलेज मध्ये निवड झालेली हि सुद्धा शहरातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे .संकेत बोधे ह्या विद्यार्थ्यांची निवड विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, पुणे येथे झाली जे महाराष्ट्रामधील टॉप कॉलेज पैकी एक आहे तसेच कु.वैभवी खाडे या विद्यर्थिनिची निवड यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीरिंग ,नागपूर येथे झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक समाजातील सर्वच स्तरावरून करण्यात येत आहे. विद्यार्थ्याने आपले यशाचे श्रेय आपल्या परिवाराला तसेच डॉ. विवेक नि. शिंदे आणि प्रा. प्रशांत तेलंग याना दिले आहे.