
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथिल भुमी पुत्र
करंजी नगरीचे भूमिपुत्र जिद्दी चिकाटी साधे राहणीमान उच्च विचारसरणी आसलेले प्रा.डॉ.ज्ञानेश्वरनारायणरावसूर्यवंशी सर यांना दि. 3/ 2 / 2021 रोजी अर्थशास्त्र या विषयामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत आज #पीएचडी प्रदान करण्यात आली.परिस्थिती माणसाला रडवते तर ती घडवतेही फक्त शिकायची इच्छा व लढण्याची जिद्द हवी मनात तर माणूस यशापर्यंत नक्कीच पोहोचतो या सुंदर विचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राध्यापक डॉक्टर #ज्ञानेश्वरनारायणरावसूर्यवंशी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास अखेर शेवटाला लावला अर्थशास्त्र सारख्या अवघड विषयात त्यांनी पीएचडी प्रदान केली. लग्न झाल्यानंतरही त्यांनी त्यांची शिक्षणाविषयीची जिद्द सोडली नाही काही दिवस त्यांनी हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे सीनियर लेक्चर म्हणून सुद्धा जॉईन झाले कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे धडे देत त्यांनी आयुष्याचे चित्र रेखाटले, प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर प्राध्यापक ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आणि हे यश संपादन केले त्यांच्या या प्रयत्नाचा आणि केलेल्या अपरिमित कष्टाचं संपूर्ण करंजी वासियानकडून कौतुक केले जात आहे.त्यांनी दाखवून दिले आहे की प्रचंड इच्छाशक्ती असल्यावर. माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हि गोष्ट हा आदर्श त्यांनी गावातील प्रत्येक शिक्षित युवापिढीला दाखवून दिला. त्यांच्याकडून गावातील युवापिढी सतत प्रेरणा घेत राहील. प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर नारायणराव सुर्यवंशी सर अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जावो आपणास भावी आयुष्यासाठी माझ्याकडून व गावकऱ्यांच्या वतीने आपणास पुढील कार्यास अनंत शुभेच्छा
