
हिमायतनगर.(प्रतिनिधी)
तालुक्यातील सर्वात मोठी गट ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आंदेगाव येथील सरपंच पदाची निवड प्रक्रिया दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर झाली त्यामध्ये सरपंच पदी आम्रपाली राऊत तर उपसरपंचपदी सौ. रुपाली रुपेश भुसावळे(नाईक) यांची निवड करण्यात आली.
या ग्रामपंचायत मध्ये एकूण नऊ सदस्य असलेल्या ग्राम पंचायती मध्ये वरील दोघांची सरपंच व उपसरपंच पदी निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून तलाठी चव्हाण साहेब,मंडळ अधिकारी एम ए. खंदारे साहेब, ग्रामसेवक बालाजी पोपुलवाड साहेब यांनी काम पाहिले यावेळी उपस्थित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य बालाजी दीपक भुसावळे ,राजू दत्ता यलकेवाड,अनिता रमेश कालेवाड,रेखा संतोष मीराशे,कांता बाई विठ्ठल वाढवे,पद्मावती लक्षमन पाकलवाड, सह शेख नुर्जाबी शेख बशीर या सर्व विजयी सदस्याचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
