शिव व्याख्याता 2021, तालुकास्तरावरीय वक्तृत्व स्पर्धेत अद्विका भोयर हिचा प्रथम क्रमांक

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर

शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघ व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यापैकी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ‘ शिवव्याख्याता 2021’ स्पर्धेचा विषय – स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज हा होता
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांपैकी पांढरकवडा येथील अद्वितीय नितीन भोयर हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक समीक्षा संतोष कावडे हिने मिळविला तर तृतीय क्रमांक साक्षी अरविंद राऊत हिने मिळविला वरील सर्व विजेत्यांचे अभिनंदन व बक्षीस वितरण करण्यासाठी मराठा सेवा संघ व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे पदाधिकारी यांनी सर्वांना भेटून शुभेच्छा दिल्या, यावेळी मराठा सेवा संघाचे शिवश्री. विजय गोडे, शिवश्री. विठोबाजी भोयर, शिवश्री. शालिग्राम राऊत, शिवश्री गंगाधर बखालै, ठाकरे सर व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे प्रशांत करपते, सुमित चाटाळे, शुभम वरगंटवार, अंगद गाडगे, पंकज वहिले, गणेश शेंडे आदी उपस्थित होते.