मराठा सेवा संघाचे आधारवड प्रा. डॉ. गणेश शिंदे सर यांचे निधन. आज संध्याकाळी 7 वाजता शेनी पारडी ता.अर्धापूर येथे अंतिम संस्कार होणार

.प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी

बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले.
डॉ.गणेश शिंदे सर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त असताना आज सकाळी 10 वाजता त्यांना छातीमध्ये थोडीशी दुखत असल्यामुळे शहरातील खाजगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले. परंतु दवाखान्यात दाखल होताच त्यांनी आपला श्वास सोडला, निधनाची बातमी कळल्यानंतर सामाजिक चळवळीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी दवाखान्यासमोर गर्दी केली, आज संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या मूळ गावी शनी पारडी ता.अर्धापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गणेश शिंदे सर यांच्या जाण्याने मराठा व बहूजन चळवळीचा मोठा आधार हरपला अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.