
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
यवतमाळ वाशिम लोकसभा कांग्रेस पक्षाचे माजी सरचिटनिस तथा करोना काळात यवतमाळ येथील दवाखान्यात अविरतपणे रूग्णाची सेवा करणारे करोना योद्धा रितेशभाऊ रमेशचंद्रजी भरूट यांचा दिनांक २१/७/२०२१ रोजी वाढदिवस होता त्या निमित्ताने राळेगाव येथे त्रिमूर्ती कांम्पलेक्समध्ये कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी जानरावभाऊ गिरी यांनी केक कापून आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला सोबतच श्रावणसिंगजी वडते सर यांच्या निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे करंजीचे सरपंच प्रसादभाऊ ठाकरे यांनी सुद्धा राळेगाव येथील शोरूममध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला. रितेशभाऊ भरूट यांचा वाढदिवस असतांना सुद्धा वेळातवेळ काढून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाशभाऊ खुडसंगे यांच्या वडीलाच्या तेरवी निमित्त भेट देऊन खुडसंगे परिवाराचे सांत्वन केले. यावेळी सर्व कार्यक्रमात कांग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रदीपभाऊ ठुणे,सुनिलभाऊ भामकर, राजेंद्रभाऊ नागतूरे,मनोजभाऊ मानकर,पवनभाऊ गिरी,खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंगजी वडते,अशोकराव काचोळे , शुभम मुके, भितकर सौरभ वडते, राहूल वडते, प्रसादभाऊ ठाकरे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .त्यांच्य या दौऱ्यात त्यांच्या अर्धांगिनी सौ प्राचीताई रितेश भरूट सुद्धा उपस्थित होत्या.
