
धारधार चाकूने भोसकल्याने व लोखंडी पाईपने तसेच डोक्यावर दगडाचा प्रहार केल्याने एका ३६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज १४ रोजी शहरातील गोमाजी वार्ड येथे मध्यरात्री घडली.
मृतक हा स्थानिक इंदिरा गांधी वार्ड येथील रहिवासी असून काही जुन्या वैमनस्यातुन ही घटना घडल्याचा अंदाज आहे.
काल रात्री मृतक ईरफान खान रशिद खान पठाण व त्याचा मित्र ईश्वर उर्फ गोलु डफ(३२) हे दोघे शहराबाहेरील राणा हॉटेल येथून जेवण करुन घरी परत जाण्यास निघाले असता गोमाजी वार्ड येथील हनुमान मंदिराजवळ पोचताच आरोपी हर्षल गिमेकर, नितीन तडस, जावेद शेख उर्फ
कालु, योगेश नरड उर्फ जादु यांनी त्यास माझा मित्र कालु यास का मारले म्हणून जाब विचारला,यावर मृतकाने चाकू दाखवित आरोपींना धमकाविले, यावेळी नितीन तडस,हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या,जावेद शेख उर्फ कालु, योगेश नरड उर्फ जादु हे मृतक जवळ आले व नितीन तडस याने मृतक यास तु बोहोत बड़ा भाई हो गया क्या? तुने भुऱ्या को क्यु मारा असे म्हणुन मृतकासोबत शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देत
वादविवाद केला. मृतकने त्याच्या खिश्यातील चाकु काढून हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या याला क्या बोलना है तेरा, डालु
क्या असे म्हटले असता हर्षल गिमेकर उर्फ भु-या हा हनुमान मंदिर जवळुन लोखंडी पाईप घेवुन आला व मृतकाचे डोक्यावर जोरदार प्रहार करू लागला याचवेळी नितीन तडस, जावेद शेख उर्फ कालु, योगेश नरड उर्फ जादु ईत्यादीनी चाकुसारख्या धारदार शस्त्राने तसेच दगडाने मृतक याला जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले,यातच इरफानखान याचा घटनास्थळीच मृत्यु झाला.
मृतकाचा सोबती गोलु डफ याने मात्र घटनास्थळावरुन पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला,गोलु डफ याने तेथून थेट पोलिस स्टेशन येथे जावून मित्राचा खून झाल्याची माहिती दिली,घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस ठाणेदार संपत चव्हाण,पोलिस उपनिरीक्षक गिरिधर पेंदोर, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.
