विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मा.प्रज्ञाताई बापट राज्याध्यक्ष शेतकरी संघटना (महिला आघाडी ) यांचा केला सन्मान……!!

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सामाजिक चळवळीत सहभागी होवून महिला सक्षमीकरण करण्यासाठी शेतकरी कष्टकरी शेतमजूर महिला साठी सतत कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिला सौ प्रज्ञा बापट यांची निवड राज्याध्यक्ष शेतकरी संघटना (महिला आघाडी ) म्हणून झाली ही विदर्भातील शेतकरी महिला आणि शेतमजूर कष्टकरी महिला साठी अभिमानाची बाब ठरली आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ च्या वतीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी महिला चे नेतृत्व करणाऱ्या “विदर्भ कन्या”चे कौतुक करणं महिला नेतृत्वाचा सन्मान करणे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हा अध्यक्ष मा.कृष्णराव भोंगाडे मा.अरुणभाऊ जोग मा.प्रा.हेमंत मुदलियार आणि मा मधुसूदनजी कोवे गुरुजी यांच्या हस्ते सौ.प्रज्ञाताई बापट यांचा सन्मान करण्यात आला आहे.

शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा म्हणून माझ्या वर जी जबाबदारी सोपवली ती पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहील शेतकरी शेतमजूर सुशिक्षित महिला ना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न राहील असे मत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित मा अशोकराव कारमोरे प्रल्हाद काळे नितीन ठाकरे अशोकराव कपिले इश्यु माळवे श्रीधर ढवस राजेंद्र झोटींग इंदरचंद बैद्य जयंतराव बापट उपस्थित होते.